top of page

श्री गजानन महाराज मेडीकल सेंटर,
(डे केअर सेंटर)
शिवाईनगर, ठाणे 


श्री गजानन महाराज मेडीकल सेंटर गेली २२ वर्षे डे-केअर युनिट म्हणून कार्यरत आहे.
संस्थेच्या ध्येय धोरणाशी निगडीत असलेला हा विभाग गरजू आणि आर्थिक रित्या दुर्बल असेलल्यां साठी तत्पर आहे.

या ठिकाणी ऍलोपॅथी , होमिओपॅथी, दंत चिकित्सा, आर्युवेदिक या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून रुग्णांना सल्ला दिला जातो. ही सेवा बाहेरील दरापेक्षा (चार्जेस) ५० टक्के सवलतीच्या दरांत दिली जाते. त्यासाठी २० तज्ञ डॉक्टर आपली सेवा देत आहेत.

दंत विभागातील रुग्णांची वेळेची बचत व्हावी म्हणून संस्थेने दंत विभागासाठी वेगळे (सेप्रेट) एक्स-रे मशीन बसविले आहे. त्याचा दंत विभागातील रुग्ण फायदा घेत आहेत. आद्ययावत सुखसोईंसह फिजिओथेरपी विभाग सुरु आहे. अल्प दरांत फिजिओथेरपीची ट्रिटमेंट दिली जाते. पॅथॉलॉजिकल चाचण्या, व इतर चाचण्या मेडीकल सेंटरमध्ये केल्या जातात. तसेच डिजिटल एक्स रे, सोनोग्राफी, एम्.आर्.आय., सिटी स्कॅन, ईसीजी इत्यादी चाचण्यांसाठी सवलतीच्या दरांत व्यवस्था केली जाते.

आयुर्वेदिक विभागातर्फे पंचकर्म (मसाज, स्वेदन, बस्ति) विभाग सुरू आहे. या सर्व सेवा बाहेरील दरापेक्षा (चार्जेस) ५०% सवलतीच्या दरांत दिल्या जातात.

मेडीकल सेंटरमध्ये मोतीबिंदू, पाईल्स इ. शस्त्रक्रिया अल्प दरांत केल्या जातात. अनेक रुग्णांनी शस्त्रक्रियेचा फायदा घेतलेला आहे. या वर्षभरात (२०२१) बाह्य रुग्ण विभागात ७,७९७ रुग्णांनी व शस्त्रक्रियांचा २५ रुग्णांनी फायदा घेतलेला आहे.

श्री गजानन महाराजांचे भक्तगण, मंडळाचे हितचिंतक, कार्यकर्ते, दानशूर भाविक, सेवाभावी डॉक्टर्स, सर्व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने मेडीकल सेंटरची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

जय धन्वंतरी

Ganesh2_edited.png

कै. आनंद कृष्णराव चोणकर (अभ्यासिका) अहवाल

“ओम नमो भगवते श्री गजाननाय”

श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे या संस्थेच्या ध्येयाशी निगडीत असलेला शैक्षणिक विभाग व त्या अंतर्गत असलेली अभ्यासिका. अद्ययावत अत्याधुनिक सुख सोईसह १५० विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विद्यार्थिनींची वेगळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेतलेला आहे. अभ्यासिकेत ५,२४१ पुस्तके आहेत.

कोविड १९ मुळे, अभ्यासिका दि. २३ मार्च २०२० पासून काही काळापर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

“आवाहन”

विद्यार्थ्यांसाठी खालील पुस्तकांची आवश्यकता असून, आपण ती पुस्तके आणून दिल्यास संस्था त्या पुस्तकांचा स्विकार करेल. 
Company Secretary, C.A., X, XI, XII Arts, Commerce, Science, MPSC, UPSC, Shipping Management,
F.Y., S.Y., T.Y. B. Com, B. A., BSC, IT,LLB., CET, NET, B.ED, D.ED, M.C.A., PSI., M.D.
Engineering, GET, IIT, M.Com

दि. १ डिसेंबर २०२१ पासून अभ्यासिका सुरु करण्यात आलेली आहे वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ,

रविवारी बंद.

bottom of page