top of page
GMM_ShivainagarThane10.jpg

संस्था परिचय

श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे हि संस्था सुरुवातीस , श्री गजानन मंडळ या नावाने १९७८ साली स्थापन केले , त्यांनतर दिनांक ९ सप्टेंबर १९८२ रोजी शासनाकडे नोंदणी करून, श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे हि सार्वजनिक संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. संस्थांचा नोंदणी क्र .

ए - ७९७ आहे , कै. सदाशिव हळबे या त्यांचा मित्रपरिवाराने लावलेले रोप वाढत आहे . हे रोप वाढविण्यासाठी अनॆक भाविकांनी हस्ते परहस्ते जी मदत केलेली आहे ; त्यातच हे आजचे स्वरूप आहे. संस्था या सर्वांची अत्यंत ऋणी आहे.

संस्थेचा वतीने धार्मिक, शैक्षणिक  व सामाजिक कार्यक्रम राबविले जातात . संस्थेचा प्रकल्प ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा उपवन तलावाच्या  पायथ्याशी  उभा राहिलेला आहे .

वार्षिक कार्यक्रम 

मंदिरातील विवीध उपक्रम आणि मंदिर सजावट 

New Doc 05-01-2022 13.38_13.jpg
.jpeg
New Doc 05-01-2022 13.38_5.jpg
New Doc 05-01-2022 13.38_12.jpg

प्रकट दिन सोहळा 

'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाच्या साली देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता 'श्रींचा प्रगटदिनोत्सव संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

वर्धापन दिवस

श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे हि संस्था सुरुवातीस , श्री गजानन मंडळ या नावाने १९७८ साली स्थापन केले , त्यांनतर दिनांक ९ सप्टेंबर १९८२ रोजी शासनाकडे नोंदणी करून, श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे हि सार्वजनिक संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली . संस्थांचा नोंदणी क्र . - ७९७ आहे ,   

श्री राम जन्मोत्सव 

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात. या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गातात, कीर्तन होते. लोकांना सुंठ-साखरेचा प्रसाद वाटला जातो.

भजन । कीर्तन कार्यक्रम 

महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.

आगामी प्रकल्प

वृद्धाश्रम 

देणगी 

मंदिर समिती सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमांसाठी भक्तांकडून देणगी स्वरूपा मध्ये सेवा स्वीकारते. रोख / चेक / बँक ट्रान्सफर  अश्या अथवा वस्तू स्वरूपा मधील देणगी स्वीकारून त्याचा योग्य विनियोग तसेच त्याच्या पावत्या आणि खर्चाचा ताळेबंद सर्व भक्तांसाठी उपलब्ध करून दिला जातो . संस्थेस  देणगी देणाऱ्यास ATG अंतर्गंत  आयकर सूट मिळते 

bottom of page